20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयभाजपची साथ सोडणार नाही

भाजपची साथ सोडणार नाही

पाटणा : मणिपूरमध्ये भाजप नेते बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आहे. या भाजप सरकारला बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांनी पाठिंबा दिली होता. मात्र, हा पाठिंबा काढून घेण्यात आला. जेडीयूने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. मात्र, पाठिंबा काढून घेण्यात आल्यानंतर नितीश कुमारांच्या पक्षाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत मणिपूरमधील प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केली.

जेडीयूच्या या निर्णयामुळे मणिपूरमधील भाजप सरकारला मोठा धक्का वगैरे बसणार नव्हता. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार नितीश कुमार आणि काही मित्र पक्षांच्या टेकू वर निर्भर असल्याने नितीश कुमारांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष आहे. सध्यातरी नितीश कुमार भाजपसोबत ठामपणे उभे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी आज पुन्हा एकदा भाजपची साथ सोडणार नसल्याचे म्हटल्याने चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळालाय.

मणिपूर विधानसभेत भाजपकडे ३२ जागा आहेत, ज्या बहुमतापेक्षा जास्त आहेत. जेडीयूचे ६ आमदार होते, त्यातील ५ पुढे भाजप सरकारमध्ये सहभागी आहेत. जवळपास दोन वर्षांपासून गोंधळात असलेल्या मणिपूरमध्ये भाजपला हा निर्णय मोठा धक्का मानला जात होता. मणिपूर विधानसभेत भाजपकडे ३२, एनपीएफकडे ५ आणि एनपीपीकडे ७ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला अनपेक्षितपणे ६ जागा मिळाल्या. काँग्रेसकडे ५ तर केपीएकडे २ जागा आहेत. सध्या जेडीयूने पाठिंबा काढून घेतल्याने भाजप सरकारला कोणताही धोका नाही. पण या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

जेडीयूचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण नितीश कुमार यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा वेगवेगळया भूमिका घेतल्या आहेत. नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला असता तर बिहारसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असती. कारण काँग्रेससह विरोधी पक्षाचे अनेक नेते नितीश कुमार आणि तेलगू देसमच्या चंद्राबाबूंना भाजपपासून दूर खेचू इच्छितात हे सर्वश्रूत आहे. आगामी काळात नितीशकुमार आणि भाजपचे संबंध कसे असतील हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR