लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित विराट सभेत भाजपाचे नेते माजी नगरसेवक अॅड. भारत साबदे, भाजपाचे पदाधिकारी गौस शेख, अॅड. गणेश कांबळे, अविराजे निंबाळकर यांची शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शहरातील गंजगोलाई येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारकाच्या परिसरात झालेल्या विराट सभेत उपरोक्त मान्यवरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत पक्षाच्या वतीने करण्यात आले. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.