18 C
Latur
Saturday, November 22, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध!

भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध!

अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख होती. आज अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांचा समावेश आहे. तब्बल १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले. निवडणुकीआधीच भाजपच्या १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे हे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचा दावा त्यांनी केला.

विभागनिहाय निवड
कोकण : ४
उत्तर महाराष्ट्र : ४९
पश्चिम महाराष्ट्र : ४१
मराठवाडा : ३
विदर्भ : ३
बिनविरोध निवडलेले नगरसेवक : १००
बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष : ३

दोंडाईचा नगरपालिकेत
२६ नगरसेवक बिनविरोध
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसह भाजपचे २६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

जामनेरमध्ये दहा
नगरसेवक बिनविरोध
जळगावच्या जामनेर नगरपालिकेतही भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. येथील नगराध्यक्षपदी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR