24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या नियोजनाअभावीच उमेदवाराचा पराभव!

भाजपच्या नियोजनाअभावीच उमेदवाराचा पराभव!

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या क्षेत्रात महायुतीचे पाच आमदार आहेत. सहापैकी पाच आमदार असतानाही पराभव होणे हा आमच्यासाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. भाजपमध्ये नियोजनाचा अभाव होता.

आगामी काळात झालेल्या चुकांची दुरुस्ती करू. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये पाहिजे तो समन्वय किंवा नियोजन नव्हते. आमदारांवर जबाबदारी देण्यात आली नाही. भंडा-याचे पालकमंत्री डॉ. गावीत यांचा संपर्क कमी होता आणि प्रशासनावर पाहिजे तेवढा प्रभाव पडू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान निर्माण करू शकले नाहीत. परिणामी, भाजपच्या नियोजनाअभावीच महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, अशी टीका भंडा-याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेने भाजपसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अमित शहांसोबत झालेल्या भेटीनंतर मोठा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची विनंती फेटाळण्यात आली आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कायम राहून देवेंद्र फडणवीस हे आता पक्षसंघटनेसाठी काम करणार आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीमध्ये झालेल्या पराभवानंतर नेत्यांच्याही उघडपणे भावना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच भंडा-याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडा-यात झालेल्या पराभवासाठी भाजपच्या नियोजनाला जबाबदार ठरवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR