22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयभाजपच्या विजयाचा पर्दाफाश करणार

भाजपच्या विजयाचा पर्दाफाश करणार

दोन दिवसांत केजरीवाल करणार गौप्यस्फोट
नवी दिल्ली : प्रतिनिधी
दोन दिवसांत भाजपचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. भाजपने महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला याचा पर्दाफाश दोन दिवसांत करेन, असे केजरीवाल म्हणाले.

ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. सगळे एक्झिट पोल भाजप पराभूत होईल, असा अंदाज वर्तवत असताना भाजपने तिकडे सत्ता टिकवली. त्यांना आधीपेक्षा जास्त जागा जिंकल्या. महाराष्ट्रात काँटे की टक्कर होईल, असे चित्र असताना प्रत्यक्षात मात्र महायुतीची त्सुनामी आली. त्यांनी २८८ पैकी २३६ जागा जिंकल्या. त्यामुळे सत्ताधारी, विरोधकांसह मतदारांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. या सगळ््या पार्श्वभूमीवर आता केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत खळबळजनक दावा केला.
केजरीवालांनी भाजपवर गंभीर आरोप केले. संपूर्ण कटाचे पुरावे माझ्याकडे आहेत. मला साक्षीदारदेखील मिळाले आहेत. मी भाजपची पोलखोल करणार आहे. संपूर्ण देशासमोर यांचा पर्दाफाश करणार आहे. तुम्ही महाराष्ट्राची निवडणूक कशी जिंकली, हरियाणात कसा विजय मिळवला, हे मी पूर्ण देशाला सांगणार आहे. दोन दिवसांत मी यांचा पर्दाफाश करेन, असा सनसनाटी दावा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR