26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeभाजपशी मतभेद, पण कोणी बोलणार असेल चर्चेची तयारी : उद्धव ठाकरे

भाजपशी मतभेद, पण कोणी बोलणार असेल चर्चेची तयारी : उद्धव ठाकरे

 

सिल्लोड : प्रतिनिधी
तुमचे आमचे मतभेद असतील. त्याच्यासाठी माझ्याशी कुणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे. पण आता ही संधी आहे, अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घातली आहे. सिल्लोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केले.

आज इथं सगळे एकवटलेत, सर्व एकटवल्यानंतर समोर कितीही मोठा माणूस असू दे तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा या देशाचा इतिहास आहे. मी भाजपला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतोय ही संधी सोडू नका. आपली संस्कृती आणि आपले संस्कार वेगळे आहेत, मी भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

दरम्यान, मी भगवा झेंडा घेऊन महाराष्ट्रात फिरतोय, आज माझ्यासमोर मुस्लीम भगिनी बसल्यात. त्यांना भीती का वाटत नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्व सोडलं नाही तरीही एवढ्या गर्दीने माझ्या मुस्लिम भगिनी सभेला येऊन बसतात, त्यांना इथे भीती वाटत नाही बिनधास्त बसतात. उलट त्यांच्यापासून भीती वाटते. हेच तर आमचे हिंदुत्व आहे.

भाजप नेते दानवेंची प्रतिक्रिया : आमच्यापुढे दोन प्रश्न आहेत, हरवायचं कुणाला, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला साद घालतोय. उद्धव ठाकरेंना हटविण्यासाठी आम्हाला साथ द्या, मात्र त्यांनी आम्हाला साद घातली अब्दुल सत्तार यांना हटवायला साथ द्या. हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. या विषयावर मी फारसं भाष्य करणार नाही. मी भाजपचा राज्यातील प्रमुख आहे. एका जागेचा विचार करत नाही. महायुती एकत्रित असा विचार करतोय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR