22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरभाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसला चार लाख मतांचा आकडा करावा लागणार पार

भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसला चार लाख मतांचा आकडा करावा लागणार पार

लातूर: विनोद उगीले
लोकसभा २०२४ चे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे, भाजपाने लातूरचा उमेदवार ही जाहीर केला आहे. असे असले तरी अत्तापासून नेते कार्यकर्ते सर्वत्र अंदाज व्यक्त करण्याबरोबरच आकडेमोडही मोठ्या प्रमाणात करीत आहेत. आकडेमोड करून अंदाज व्यक्त केले जात आहेत. ही आकडेमोड पाहता विशेष म्हणजे अद्यापपर्यंत एकदाही चार लाख मतांचा टप्पा पार करू न शकलेली काँग्रेस या निवडणुकीत हा मताचा टप्पा पार करू शकलीतर भाजपाचा विजयी रथ रोखण्यात काँग्रसेला यश येणार आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच या मतदारसंघाचे सलग सात बेळा नेतृत्व करणारे व विविध पदे भुषविणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याबरोबरच या मतदारसंघातील तत्कालीन मुख्यमंत्री तथा केंद्रीयमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर मतदारसंघाची वेगळीच ओळख महाराष्ट्र राज्याबरोबरच संपूर्ण देशात आहे. हे जरी खरे असले तरी या मतदारसंघात एकदाही चार लाख मताचा आकडा काँग्रेस पक्षाला पार करता आलेला नाही. मोदीच काय तर कोणत्याही लाटेचा या मतदारसंघातील काँग्रेसच्या मतावर परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
१९७७ साली काँग्रेसचे उमेदवार पी. जी. पाटील यांना १ लाख ७० हजार १६४ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी व या निवडणुकीत विजयी ठरलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार यु. एस. पाटील यांना १ लाख ७८ हजार ८१५ मते मिळाली होती. तर १९८० साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ५३ हजार ९४८ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांना लाखांचाही आकड़ा पार करता आलेला नव्हता. १९८४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४६६ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस एस. चे उमेदवार पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार १२९ मते मिळाली होती. १९८९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख ३ हजार ७३३ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी जनता दलाचे उमेदवार डॉ. बापुसाहेब काळदाते यांना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ३७ हजार ८५३ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना १ लाख ७१ हजार १३५ मते मिळाली होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ७९ हजार ७७५ मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना २ लाख ४०३ मते तर जनता दलाचे उमेदवार बापुसाहेब काळदाते यांना १ लाख ६८ हजार ७२५ मते मिळाली होती.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख २२ हजार २६५ तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना ३ लाख ११ हजार ९३८ मते मिळाली. १९९९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख १४ हजार २१३ तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना २ लाख ७३ हजार १२३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाशा पटेल यांना १ लाख ५५ हजार ८१६ तर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या भाजपाच्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी ४ लाख ४ हजार ५०० मते मिळवत शिवराज पाटील चाकूरकर यांचा प्रथमत:हा या मतदारसंघात पराभव केला होता. या निवडणूकीत काँग्रसेचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख ७३ हजार ६०९ मते मिळाली होती.
२००९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत परत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांना ३ लाख ७२ हजार ८९० मते मिळाली होती तर भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांना ३ लाख ६४ हजार ९१५ मते मिळाली होती. २०१४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात इतिहास घडवत भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांनी ६ लाख १६ हजार ५०९ मते मिळवत मोठा विजय संपादन केला होता तर या निवडणुकीतील विशेष म्हणजे ज्या लाटेमुळे  काँग्रेसला ६० वर्षांची सत्ता सोडावी लागली होती. या मोदी लाटेतही मतदारसंघात काँग्रेसला व त्यावेळचे उमेदवार दत्तात्र्य बनसोडे गुरूजी यांना प्रत्येक निवडणुकीत मिळालेल्या मताच्या तुलनेतच ३ लाख ६३ हजार ११४ मते मिळाली होती हे विशेष आहे. तर २०१९ च्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. पण मागील निवडणुकीतील मताचा आकडा पाहता व मतदारात झालेली वाढ, मतांचा वाढलेला टक्का तरीही या निवडणुकीतही काँग्रेसचे दमेदवार मच्छिंद्र कामत व काँग्रेस साडेतीन लाख मतांच्या आकड्यात खेळली काँग्रसेला या निवडणूकीत ३ लाख ५७ हजार ५६ इतकी मते मिळाली होती तर भाजपाला ६ लाख ४१ हजार ९४ मते मिळाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR