22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे?

भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे?

मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे विद्यमान प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२९ मध्ये शतप्रतिशत भाजप म्हणजेच महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भाजपचे २०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचेही भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच यावेळी रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचेया प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. २०२९ मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देणार असल्याचे समोर आले आहे. एकट्या भाजपचे २०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचे असे उद्दीष्ट आहे.

२०सप्टेंबर १९७० रोजी मुंबईतील कल्याणमध्ये रविंद्र चव्हाण यांचा जन्म झाला. २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या चार टर्ममध्ये ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली.

२०२२ मध्येही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, २०१४ पासून २०२४ पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी कामगिरी बजावली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन आघाडीलाही माती चारली. पण आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी न घेता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR