लातूर : प्रतिनिधी
भाजपच्या लातूर जिल्ह्यातील नियोजित बैठकीत भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्यावर देविदास काळें व त्यांच्या साथीदारांनी बैठकीत अनेक भाजपाच्या पदाधिकारी यांच्या समोर लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदरची घटना लोकशाही व भाजप यांच्या कार्यपद्धतीवर काळीमा फासणारी असुन भर सभेत भाजपाच्या अनेकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने देविदास काळें याची पक्षातुन त्वरित हक्कालपट्टी करावीं, अशी मागणी शिवा संघटनेने एका ठरावाद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह लातूर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक लातुर यांना देण्यात आले आहे.
दिवसाढवळ्या मारहाण करुन दहशत निर्माण करणा-या देविदास काळें व त्यांच्या साथीदारांवर ताबडतोब हक्कालपट्टी करावी अन्यथा या घटनेविरुध्द न्याय मिळविण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज व शिवा संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल याची प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशारा शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता खंकरे यांनी बुधवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शिवा संघटनेच्या या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, कीर्तनकार रामराव लखादिवे महाराज, कल्पनाताई बावगे, पद्मीनताई खराडे, जगन्नाथअप्पा कोळंबे, परमेश्वर स्वामी हरंगुळ, गणेश मुळे, अशोक नाईकवाडे, ईश्वर बुलबुले, भीमाशंकर लखादिवे, ज्ञानेश्वर लखादिवे, रतिकांत स्वामी तोंडारकर, सचिन मंगनाळे देवणीकर, अमित आठाणे उदगीरकर, सचिन बिरादार निलंगेकर, परमेश्वर ठेसे औसेकर, नीलकंठप्पा शिवणे, विवेकआप्पा खंकरे अहमदपूरकर, संगमेश्वर स्वामी रेणापूरकर, प्रशांत स्वामी चाकूरकर, शिवा उप्परबावडे उदगीर, सोमेश्वर शेटे चाकूरकर, बाळासाहेब धुप्पे हंडरगुळीकर आदींची उपस्थिती होती.