22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयभाजप-शिवसेना युती फेविकॉलचा जोड

भाजप-शिवसेना युती फेविकॉलचा जोड

एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आता सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, आज राजधानी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली, यावेळी सर्व खासदारांच्या संमतीने नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी विविध मित्रपक्षांच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यांच्या नावाला संमती दर्शवली.

आज जुन्या संसद भवनात एनडीच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना नेतेपदी निवडण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावावेळी टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एकनाथ शिंदे, चिराग पासवान, पवन कल्याण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,

आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
मी माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पांिठबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढे नेले, जगात देशाचे नाव चमकावले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करुन नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळेच खोटे नरेटिव्ह पसरवणा-या आणि जनतेची दिशाभूल करणा-या विरोधकांना देशातील जनतेले नाकारले आणि तिस-यांदा मोदींना स्वीकारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR