20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeसोलापूरभाजीपाल्याची आवक घटली,दर कडाडले

भाजीपाल्याची आवक घटली,दर कडाडले

सोलापूर : लहरी पावसामुळे घटलेले अल्प उत्पादन, मागणीत झालेली वाढ दररोज बदलणारे हवामान व अलीकडेच थंडीमुळे वातावरणात बदलामुळे भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुण्यात भाजीपाला महागला आहे. सोलपूरमध्ये तर खाद्यतेलापेक्षा वांगी, गवार, शेवगा महागली आहे.

सोलापूरमध्ये एक किलो गवार १६० रुपयांना मिळतेय. त्यामुळे आठवड्यात कोणताही दिवस असू द्या, बाजारात भाव खातेय गवार असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोथिंबीर, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका, पालक, मेथी स्वस्त झाली असल्याची माहिती घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली. काहीशी तुरट चव असणारी गवारीची भाजी कुणालाच फारशी आवडत नाही. पण खरं सांगायचं तर गवारीची भाजी खूप छान लागते. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. याशिवाय यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ३०० ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक आढळतात. आहारात गवारीची भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच, हृदयविकार दूर राहतात. गृहिणींची त्यामुळे पहिली पसंती गवारीला असते.

हॉटेलमध्ये फारच कमी मागणी असलेली गवार गृहिणींच्या मात्र पहिल्या पसंतीची. पावसाळी वातावरणात गवारीच्या उत्पन्नात घट झाली. आवक खाली आली आहे. त्यात गवार पहिल्या पसंतीची असल्याने तिचे भाव नेहमीच चढे राहतात. त्याचाच परिणाम म्हणून आवक कमी झाल्याने गवारने दीडशेचा टप्पा गाठला आहे. बहुतांश भाजीपाल्याच्या किमती वाढल्या असतानाच आता लसणाला प्रतिक्चिटल १८ हजार ते २७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. लसूण उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो २२० ते ३०० रुपये द्यावे लागत असल्याने लसणाच्या फोडणीसाठी सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार असल्याचे चित्र आहे. गवारची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR