25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरभातखेडा येथील भाजपचे सरपंच बेद्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भातखेडा येथील भाजपचे सरपंच बेद्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत. तरीही लातूर भाजप अद्याप चाचपडत असताना दिसत आहे. दिवसेंदिवस भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणा-यांची संख्या वाढताना दिसत आहे. रविवार दि. ४ नोव्हेंबर रोजी लातूर तालुक्यातील भातखेडा येथील भाजपचे दिग्गज नेते सरपंच तथा सोसायटी चेअरमन उमेश बेद्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत उमेश बेद्रे यांनी त्यांच्या सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. काँग्रेस प्रवेशानंतर बेद्रे यांनी लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांची भेट घेतली.
उमेश बेद्रे यांच्यासह गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सोसायटीचे सदस्य यांच्यासह युवक पदाधिका-यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत आशियाना बंगल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  यावेळी दिलीपराव देशमु यांनी सर्वांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उमेश बोद्रे यांनी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथे जाऊन भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार करु, असा शब्द त्यांनी यावेळी आमदार धिरज देशमुख यांना  दिला.
यावेळी उमेश बेद्रे यांच्यासह आजम शेख, व्हाइस चेअरमन धनराज मुमाने, तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक पठाण, हणमंत बोळेगावे, उमाकांत हुरदुडे, मैनुद्दीन शेख, अशोक मेळकुदे, उमाकांत मेळकुदे, नागराज बेद्रे, विनायक शेळके, शिवाजी बारमाळे, रामेश्वर मुमाणे, अंकुश निरुडे, परमेश्वर मुमाणे, रसुल शेख, सुरज बेद्रे, शंकर कुमटकर, विरभद्र मुरगे, रवी बेद्रे, हणमंत मुमाणे, संगमेश्वर कंरवदे, संतोष बेद्रे, चेतन हिप्परगे, शाम बोळेगावे, गुरुसिध्द बेद्रे, रमाकांत नकाते, संदानद बेद्रे, तौसिफ शेख, अनिस पठाण, चाँद शेख, अविनद मेळकुदे, अनिल नकाते, नजीर शेख, आसिफ शेख, महेताब शेख, नागनाथ बेद्रे आदींचा समावेश आहे.  यावेळी विलास साखर कारखान्याचे माजी संचालक गोवर्धन मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, राजकुमार पाटील, सचिन दाताळ, प्रताप पडिले, सतीश पाटील ममदापूरकर, जनार्दन वंगवाड, प्रताप पाटील, बादल शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR