23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारतविरोधी कट : बांगलादेशात अमेरिकी सैन्याचे १०० जवान

भारतविरोधी कट : बांगलादेशात अमेरिकी सैन्याचे १०० जवान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसल्याने डोनाल्ड ट्रम्प हे आता भारतावर दबाव टाकण्यासाठी हद्द पार करताना दिसत आहेत. बांगलादेशच्या चटगांवमध्ये अमेरिकी सैन्याचे १०० जवान पोहोचले आहेत. दुसरीकडे यादरम्यानच भारताने देखील म्यानमारमध्ये तिन्ही लष्कराचे मिळून १२० जवान पाठवले आहेत.

बांगलादेश आणि चटगांव शहरात बंगालची खाडी रणनीतीवर आहे. मात्र, मागील आठवड्यापासून येथे अमेरिकेच्या लष्कराच्या हालचाली वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेच्या वायुसेनेचे सी-१३० जे हर्क्यूलिस विमान शाह अनामत विमानतळावर उतरवण्यात आले. ज्यामध्ये लष्कर आणि काही वायुसेनेचे अमेरिकेचे अधिकारी होते. हेच नाही तर अमेरिकेचे लष्कर ढाकातील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येही थांबले होते. मात्र, त्याबद्दलची कोणतीही नोंद हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नाही.

यामुळे भारताच्या विरोधात काहीतरी मोठा कट रचला जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. असेही सांगितले जात आहे की, हे दोन्ही देशांमधील युद्ध अभ्यास आहे, मग प्रश्न उपस्थित होतो की, याला इतके गुप्त का ठेवले जात आहे. हा अमेरिकेचा मोठ्या रणनीतीचा भाग असल्याचेही बोलले जात आहे.

ज्या भागात अमेरिकी सैन्याच्या बांगलादेशात हालचाली वाढल्या त्याच्या बाजूच्या भारताच्या भागात भारतीय सैन्य देखील मोठ्या संख्येने रवाना करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशांसोबत जवळीकता वाढवल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारत देखील प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर ठेवून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR