भारताचा सुवर्ण षटकार, बॉक्सिंग, तिरंदाजी, कुस्तीत डंका

भारताची उत्तुंग झेप, १६ सुवर्ण पदकांसह भारत टॉप फाईव्हमध्ये दाखल, एकूण पदक संख्या ७६ वर

ऐची-नागोया : वृत्तसंस्था
आशियाई स्पर्धेत शुक्रवार भारतासाठी गोल्डन डे ठरला. भारतीय क्रीडापटूंनी आज सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत ६ सुवर्ण पदकांसह एकूण १० पदकांची कमाई केली. भारतीय क्रीडापटूंच्या दमदार कामगिरीमुळे ७६ पदकांसह भारत टॉप फाईव्हमध्ये पोहोचला. ३ बॉक्सिंग, १ तिरंदाजी, १ कुस्ती आणि १ महिला हॉकी संघ अशा ६ पदकांची कमाई केली. आजच्या सुवर्ण षटकारामुळे भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या १६ वर पोहोचली. आज भारताने ६ सुवर्ण, २ कांस्य आणि २ रौप्य पदकांसह १० पदकांची कमाई केली.

जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. बॉक्सिंगमध्ये भारताच्या सुवर्णमुकुटात आणखी भर पडली. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेन आणि ६५ किलो वजनी गटात परवीन हुड्डा यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात अंकुश पंघालने सुवर्ण पंच मारत इतिहास रचला. आज भारताने एकट्या बॉक्सिंगमध्येच ३ सुवर्ण पदक पटकावले. परवीन हुड्डाने महिलांच्या ६५ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या चेन निएन चिनचा ३-२ असा पराभव केला. परवीन हुड्डा ही आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारतातील तिसरी महिला बॉक्सर ठरली.

तिच्यापूर्वी २०१४ मध्ये दिग्गज मुक्केबाज मेरी कोमने आणि याच चालू स्पर्धेत लवलिना बोरगोहेनने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. एकाच दिवशी अवघ्या मिनिटाच्या अंतरात लवलिना आणि परवीनने सुवर्ण कमाई केली. यासोबतच कुस्तीत पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात भारताच्या सुजीत कलकलने अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत त्याने ही सुवर्ण कमाई केली. याशिवाय तिरंदाजी आणि हॉकी स्पर्धेतही भारताने सुवर्ण पदक जिंकले.

यासोबतच सुवर्ण पदक मिळवून देणा-या कुमकुम मोहाडसह धीरज बोम्मदेवरा या तिरंदाजीपटू जोडीने मिक्स्ड टीम रिकर्व्हमध्ये रौप्य पदक आणि धीरज बोम्मदेवरा, नीरज चौहान, यशदीप भोगे या पुरुष तिरंदाजपटूंनीही रौप्य पदक मिळविले. याशिवाय सेलिंग (महिला डिंघी) स्पर्धेत भारताच्या नेत्रा कुमाननने आणि सेपाकतकरा (क्वाड्रेट) च्या भारतीय पुरुष संघानेही कांस्य पदक पटकावले.

तिरंदाजीत महिलांची सुवर्णकमाई
बॉक्सिंग सोबतच तिरंदाजीतही भारतीय महिला संघाने इतिहास रचला. भारतीय महिला तिरंदाजी संघाने दक्षिण कोरियाचे वर्चस्व संपवत आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच मिक्स्ड रिकर्व्ह संघ आणि पुरुष रिकर्व्ह संघानेही चमकदार कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावे केले. रिकर्व्ह तिरंदाजीच्या महिला सांघिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर कुमकुम मोहोडने धीरज बोम्मादेवराच्या साथीने अचूक नेमबाजी साधत भारताला सुवर्ण पटकावून दिले. कुमकुम मोहाडे ही अमरावती जिल्ह्यातील क्रीडापटू आहे.

भारतीय महिला हॉकी
संघाची सुवर्ण भरारी
भारताच्या महिला हॉकी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनला १-० ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. यासोबतच भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली. १९८२ नंतर प्रथमच भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिलांनी आशियाई खेळांमधील ४४ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला.
पदक जिंकणारे भारतीय खेळाडू

सुवर्ण पदक
-तिरंदाजी : अंकिता भकत, कुमकुम मोहोडे, कीर्ति शर्मा (महिला टीम रिकर्व्ह)
-लवलीना बोरगोहेन : बॉक्सिंग (महिला ७५ किलो)
-परवीन हुड्डा : बॉक्सिंग (महिला ६५ किलो)
-अंकुश पंघाल : बॉक्सिंग (पुरुष ८० किलो)
-सुजीत कलकल : कुस्ती (पुरुष ६५ किलो)
-भारतीय महिला संघ : हॉकी

रौप्यपदक
कुमकुम मोहोद, धीरज बोम्मदेवरा : तिरंदाजी (मिक्स्ड टीम रिकर्व्ह)
-धीरज बोम्मदेवरा, नीरज चौहान, यशदीप भोगे : तिरंदाजी (पुरुष टीम)

कांस्य पदक
नेत्रा कुमानन : सेलिंग (महिला डिंघी)
-भारतीय पुरुष संघ : सेपाकतकरा (क्वाड्रेट) – कांस्यपदक

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news