17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयभारताचे लष्करी बळ वाढणार

भारताचे लष्करी बळ वाढणार

प्रलय लवकरच ताफ्यात, शत्रूंचे तळ क्षणात उद्ध्वस्त करण्याची क्षमता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय लष्कर लवकरच आपल्या ताफ्यात ४०० किमी पल्ल्याच्या प्रलय क्षेपणास्त्राचा समावेश करणार आहे. हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले जाईल, ज्यामुळे शत्रूचे तळ आणि शस्त्रास्त्रे एका क्षणात नष्ट करता येणार आहेत.

प्रलय क्षेपणास्त्र हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ज्याची मारक क्षमता १५० ते ५०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र २०२२ मध्ये भारतीय हवाई दलासाठी मंजूर करण्यात आले होते. यानंतर एप्रिल २०२३ मध्ये त्याच्या दोन युनिट्सनाही मंजुरी मिळाली होती. आता भारतीय लष्कर आपल्या रॉकेट फोर्समध्ये त्याचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचे बळ वाढण्यास मदत होणार आहे.

प्रलय क्षेपणास्त्राचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ते शत्रूचे तळ, बंकर, तोफ आणि शस्त्रे डेपो फार लवकर नष्ट करू शकते. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये त्याची २४ तासांच्या आत दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तैनात केले जाणार आहे. प्रलय क्षेपणास्त्राची अचूकता आणि वेग हे सर्वात मारक ठरते. प्रलय क्षेपणास्त्राची अचूकता इतकी जास्त आहे की ते ३३ फूट त्रिज्येमध्ये आले तरी ते क्षेत्र पूर्णपणे नष्ट होईल. त्याची लाँचिंग सिस्टीममध्ये ८८ टाटा ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर आहे. भारतीय लष्करात प्रलय क्षेपणास्त्राचा समावेश केल्याने देशाच्या संरक्षण क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.

१ हजार किलो शस्त्रे
वाहून नेण्याची क्षमता
प्रलय क्षेपणास्त्राचे वजन सुमारे ५ टन आहे आणि ते ५०० ते १००० किलो शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र प्रहार, पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या तीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचा वेग त्याला अधिक धोकादायक बनवतो. प्रलय क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळी हल्ला करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रात बसवलेल्या इन्फ्रारेड किंवा थर्मल स्कॅनरच्या मदतीने रात्रीच्या वेळीही अचूक हल्ले करू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR