नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून दोन दिवसांच्या अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. हा दौरा भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करेल. यावेळी, संरक्षण सहकार्य तसेच चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी प्रभावासंदर्भातही प्रामुख्याने वाटाघाटी होणार आहेत.
कटएउ संदर्भात नियोजन : भारत आणि अमेरिका अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. यांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर. आयएमईसी हा केवळ एक व्यापार मार्ग नाही तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) काउंटर करण्यासाठी तयार केलेली रणनीती आहे. आयएमईसीच्या माध्यमातून भारताच्या तंत्रज्ञान आणि रासायनिक क्षमतेत वाढ होईल.
आयएमईसीच्या माध्यमाने ४५०० किमी लांबीचा कॉरिडॉर तयार होईल. जो भारताला मध्य पूर्वेद्वारे युरोपशी जोडेल. आयएमईसी ग्लोबल सप्लाई चेन मजबूत करेल आणि व्यापार मार्गांवरील चीनच्या नियंत्रणाचे धोके दूर करेल. सध्या, चीन मलाक्का सामुद्रधुनी, होर्मुझ सामुद्रधुनी आणि बाब अल-मंदाब सारख्या सागरी महत्त्वाच्या जलमार्गांवर आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे.
अदानी समूह ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. ही कंपनी इस्रायलच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करत आहे. अदानी समूहाने हायफा बंदरात टर्मिनल बांधण्यासाठी गुंतवणूक केली. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हायफा बंदरात अदानी समूहाचा ७० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. यामुळे केवळ भारत-इस्रायल संबंधच मजबूत होणार नाहीत तर भारताला भूमध्य समुद्रात पाय रोवण्याची संधी देखील मिळेल.