भारतीय नेमबाजांनी केली कमाल
टोकियो : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुस-या दिवशी भारताने आपले पहिले मेडल जिंकून खाते उघडले. भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. याआधीही पहिली दोन्ही पदके नेमबाजीत मिळवली होती. आता पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टीम इवेंटमध्ये भारताने सिल्वर मेडल जिंकले. भारताच्या पार्थ माने, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशू ढिल्लन यांनी मिळवून दिले. चीनने १० मीटर एअर रायफल मेन्स टीम इवेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकले. दरम्यान व्यक्तिगत स्पर्धेत भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्य तर रुद्राक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावले. यासोबतच महिला ट्रॅडिशनल ६० किलो ग्रॅम स्पर्धेत सुचिका तारियालने कांस्य पदक पटकावले.
दरम्यान, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशू ढिल्लन यांनी १० मीटर एअर रायफल मेन्स इवेंटच्या व्यक्तिगत गटात फायनलमध्ये क्वॉलिफाय केले. या स्पर्धेत हिमांशू ढिल्लन याने व्यक्तिगत रौप्य पदक पटकावले तर रुद्राक्ष पाटील याने कांस्य पदक पटकावले. तत्पूर्वी पार्थ माने इंडिविज्युअल फायनलच्या शर्यतीतून बाद झाला. त्यामुळे व्यक्तिगत गटात भारताला आणखी दोन पदकांचा लाभ झाला. यासोबतच महिला ट्रॅडिशनलमध्ये सुचिता तारियालने कांस्य पदक पटकावले. कालच्या दोन पदकानंतर आज दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळविल्याने भारताच्या पदकांची संख्या आता ६ झाली आहे.
















