नवी दिल्ली : काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी वाद सुरू झाला होता. यानंतर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला होता. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी चिंता व्यक्त केली. बहिषाकारामुळे देशाच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या लोकांच्या वतीने भारतीयांची माफीही मागितली आणि भारतीय पर्यटकांनी आपल्या देशात येत राहावे अशी माझी इच्छा आहे असे म्हटले आहे.
भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक वाद सुरूच आहे. दरम्यान, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपल्या देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालदीवच्या जनतेच्या वतीने त्यांनी माफीही मागितली. नशीद सध्या भारतात आहेत. दोन्ही देशांमधील तणावाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मालदीवच्या लोकांना ‘माफ करा’ असे सांगितले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते. मला आणि मालदीवच्या लोकांना खेद वाटतो, असे मला म्हणायचे आहे. माजी राष्ट्रपतींनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि ते म्हणाले मी काल रात्री पंतप्रधानांची भेट घेतली.
आम्ही मोदींचे समर्थक
पीएम मोदींनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा समर्थक आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो. बहिष्कारासाठी जबाबदार असलेल्यांना दूर करण्यासाठी विद्यमान राष्ट्रपतींनी केलेल्या तत्पर कारवाईचेही त्यांनी कौतुक केले. माजी राष्ट्रपती म्हणाले मला वाटते की या प्रकरणांचे निराकरण केले पाहिजे आणि आपण मार्ग बदलला पाहिजे आणि आपल्या सामान्य संबंधांकडे परत यावे असेही नशीद म्हणाले.