शानदार कामगिरी, स्क्वॅश स्पर्धेत २ रौप्य पदके
आईची नागोया : वृत्तसंस्था
आशियाई स्पर्धेत रविवार भारतीय अॅथलिटस्नी गाजवला. मराठमोळा सर्वेश कुशारे उंच उडीत तर एंसी सोजन एडप्पिली लांब उडीत सुवर्णपदकासाठी स्पर्धेत होते. परंतु अखेरच्या टप्प्यात दोघांनाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय पारुल चौधरीने ३ हजार मीट स्टीपलचेजमध्ये कांस्य, तेजस्वीन शंकर आणि हरिता भद्राने डेकाथलॉन आणि महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. भारतीय अॅथलिटस्नी आज २ रौप्य आणि ३ कांस्य असे मिळून एकूण ५ पदकांची कमाई केली. यासोबतच स्क्वॅश स्पर्धेतही २ रौप्य पदके मिळाली.
आज मिळविलेल्या ५ पदकांसह या स्पर्धेत भारतीय अॅथलिटस्नी एकूण १३ पदकांची कमाई केली. यामध्ये ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. आज मराठमोळा नाशिकचा सर्वेश कुशारेने उंच उडीत २.२५ मीटर उंच उडी घेऊन रौप्य पदक पटकावले तर चिनी तैपेईच्या फु चाओ- ुसुआनने सुवर्णपदक पटकावले. महिला लांब उडीत एंसी सोजन सुवर्णपदकाच्या जवळ पोहोचली होती. परंतु अखेरच्या फेरीत चीनच्या हुआंग यिंगयिंगने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे सोजनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. स्क्वॅशमध्येही भारतीय क्रीडापटूंनी शानदार प्रदर्शन केले. स्क्वॅशमध्ये पुरुष सिंगल्समध्ये अभय सिंह आणि महिला सिंगल्समध्ये अनाहत सिंह यांनी रौप्य पदक पटकावले.
मराठमोळ््या सर्वेशचे
सुवर्णपदक हुकले
आठव्या दिवशी अॅथलेटिक्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत नाशिकचा अॅथलिट सर्वेश कुशारेने रौप्य पदकावर नाव कोरले. त्याने २.२५ मीटरची उंची पार करीत दुसरे स्थान मिळविले. तैपेईच्या फू चाओ- ुसुआनच्या गळ््यात सुवर्णपदक पडले. सर्वेशलाही तेवढेच गुण असताना त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याने पदकाची ५६ वर्षांची प्रतीक्षा संपविली.
















