भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास!;

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. टीम इंडियाने दिलेल्या  २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १५.४ षटकांत ६९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाने १४७ धावांच्या फरकाने विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील नेतृत्वाखालील संघाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने या स्­पर्धेत सुवर्ण पदकाचे खाते उघडले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २१७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २१६ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावले, तर रिचा घोष आणि शफाली वर्मा यांनी प्रभावी फलंदाजी केली. मानधना आणि शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करून दिली.

मानधनाने ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शफालीचे अर्धशतक हुकले आणि ती ४८ धावांवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर १९ धावांवर बाद झाल्याने भारताला दुसरा धक्का बसला. मानधनाने आपली खेळी सुरू ठेवली, पण अखेरीस ती ४५ चेंडूंत ७९ धावा करून बाद झाली; तिने या खेळीत पाच चौकार आणि सात षटकार लगावले. त्यानंतर रिचा घोषने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली. रिचा आणि भारती फुलमाली यांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रिचा २२ चेंडूंत ४९ धावांवर (सहा चौकार आणि तीन षटकारांसह) नाबाद राहिली, तर भारती ७ धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून सुगंधिका कुमारी, कविशा दिलहारी आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्य्ेकी एक बळी घेतला.

श्रीलंकेची अडखळत सुरुवात
भारताने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. १८ धावांवर शफाली वर्माने इमिशा दुलानीला बाद करून पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर शफाली वर्माने हसिनी परेरा बाद केले आहे; हसिनीला खातेही उघडता आले नाही .

श्रीलंकेच्या कर्णधार अथापथ्थूचा डाव सावरण्याचा प्रयत्न
दोन झटपट गडी गमावल्यानंतर श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथ्थूने डाव सावरण्­याचा प्रयत्­न केला. मात्र दीप्ती शर्माने तिला २९ धावांवर बाद करत श्रीलंका संघाला मोठा धक्­का दिला. तिने २१ चेंडूचा सामना करत पाच चौकारांसह २९ धावा केल्या.

५० धावांच्या आत श्रीलंकेचा निम्­मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
श्रेयंका पाटीलने हर्षिता समरविक्रमाला बाद करून श्रीलंकेला चौथा धक्का दि. ४४ धावांच्या धावसंख्येवर श्रीलंकेने चार विकेट्स गमावल्या. या दीप्ती शर्माने भारतीय महिला संघासाठी सहावी विकेट घेतली आहे. तिने कविशा दिलहारीला बाद केले; कविशाने १३ चेंडूंत ११ धावा केल्या होत्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. श्रीलंकेने ४९ धावांत सहा विकेट्स गमावल्या. भारतीय संघाचा विजय दृष्­टीक्षेपात आला.

श्रीलंका संघाचा डाव अवघ्­या ६९ धावांवर संपुष्­टात
श्री चरणीने काव्या कविंडीला बाद करून श्रीलंकेला सातवा धक्का दिला. काव्या दोन धावांवर बाद झाली. यानंतर भारतीय संघाने तीन विकेटची औपचारिकता पूर्ण केली. श्रीलंकेचा संघ अवघ्या १५.४ षटकांमध्­ये ६९ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १४७ धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावले.

भारतीय संघाची सुवर्णपदकाची परंपरा कायम
२०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्­यात आला. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने सुवर्णपदक जिंकले होते.त्यावेळीही अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. यंदा जपानमधील आयची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकविण्­याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news