लातूर : प्रतिनिधी
देश पातळीवर महिलांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संघटना असलेल्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लातूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुमुद भार्गव यांची निवड झाली आहे. संघटनेची राष्ट्रीय सभा नुकतीच भुवनेश्वर येथे झाली या सभेत श्रीमती कुमुद भार्गव यांची निवड करण्यात आली.
गेल्या ४० वर्षांपासुन श्रीमती कुमुद भार्गव सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. भारतीय स्त्री शक्ती संघटनेत त्यांनी ३५ वर्षा पुर्वी काम करण्यास सुरुवात केली. संघटनेत त्यांनी ६ वर्ष महाराष्ट्र प्रांत सचिव, ७ वर्ष राष्टीय सचिव म्हणुन यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. समुपदेशनाच्या क्षेत्रातही त्यांच नाव आदराने घेतल जाते. त्यांनी विविध सामाजिक संस्थाच्या स्थापनेत पुढाकार घेउन काम केल आहे. लातूरातील सर्वात जुन्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या शालेय समितीच्या सध्या त्या अध्यक्षा आहेत. श्रीमती कुमुद भार्गव विविध वृत्तपत्रात नियमित सदर चालवले असुन त्यांची ३ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.