मुंबई : वृत्तसंस्था
सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आहे. सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. कलाकारांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे आगमन होताना पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री भारती सिंहच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे.
भारतीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, तिने तिने बाप्पाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये तिला यंदा बाप्पाकडे काय मागणार आहेस, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली की, या वर्षी मी हीच प्रार्थना करेन की, सगळे नीट होऊ देत.
कोविडसारख्या समस्या पुन्हा येऊ नयेत. सगळ्यांना गणेशोत्स्व आनंदात जल्लोषात साजरा करता यावा. तिच्या मुलाबद्दल बोलताना म्हणाली गोलाला एक छोटी बहीण हवी आहे, जी त्याच्याबरोबर मस्ती करेल. गणेशोत्सवनिमित्त अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.