18.5 C
Latur
Saturday, November 30, 2024
Homeक्रीडाभारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल

भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल

गयाना : भारताने इंग्लंडला धुळ चारत टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने यावेळी इंग्लंडच्या २०२२ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपममधील पराभवाचा बदला घेतला. रोहित शर्माने या सामन्यातही धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. रोहितच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी ़करताना १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने जोस बटलरला पॉवर प्लेमध्येच बाद केले आणि तिथेच त्यांनी इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर कुलदीपने तीन विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने यावेळी इंग्लंडवर ६८ धावांनी विजय साकारला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

जोरदार पाऊस पडल्यावर रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतला फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले. दोन विकेट्स झटपट पडल्या असल्या तरी त्यानंतर रोहितने त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. रोहितने यावेळी सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्यानंतर रोहित पुन्हा शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण यावेळी रोहित शर्माला रशिद खानने क्नी बोल्ड करत भारताला मोठा धक्का दिला. रोहितने यावेळी सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर सूर्या दमदार फलंदाजी करत होता आणि तो अर्धशतकाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता.

सूर्याला मात्र यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. यापूर्वी सूर्याने या वर्ल्ड कपमध्ये दोन अर्धशतक झळकावली होती. पण यावेळी मात्र त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. सूर्याने यावेळी ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या. सूर्या बाद झाला तर त्यानंतर हार्दिक पंड्याने भारताची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. हार्दिकने यावेळी १३ चेंडूंत २३ धावा केल्या. भारताला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा करता आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR