26.1 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रभीषण अपघातात बसचा चक्काचूर; १ ठार, २१ जखमी

भीषण अपघातात बसचा चक्काचूर; १ ठार, २१ जखमी

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. अशातच ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २१ प्रवासी जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झालेला आहे.

काही दिवसांपूर्वी धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे बस अपघात होऊन २८ प्रवासी जखमी झाल्याची झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा सकाळी धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार आणि २१ प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमका कसा झाला अपघात
धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल
दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण पवन देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काश रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR