31 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeमहाराष्ट्रभीषण अपघातात २६ म्हशी ठार

भीषण अपघातात २६ म्हशी ठार

जनावरांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला

नंदुरबार : प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. जनावरांना घेऊन जाणारा ट्रक घाट रस्त्यात पलटी झाला असून अपघातात म्हशीचे पिल्लू वासरू ठार झाले आहे. तर काही म्हशीचे रेडकू जखमी झाले आहेत. शिवाय ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाला असून जखमीला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात असलेल्या चरणमाळ घाट रस्त्यात सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. सकाळी म्हशी व वासरु घेऊन ट्रक पिंपळनेरकडून गुजरातच्या दिशेने जात असल्याचे समजते. पिंपळनेरकडून सकाळी सात वाजता गुजरातकडे जात असताना ट्रक चरणमाळ घाटात रस्त्याच्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे घाट रस्त्यातील वळणावर ट्रँक पलटी झाला आहे.

घाट रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने ट्रक रस्त्याच्या खाली खोल दरीत गेला. अपघात होताच घाट परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये ३५ रेडकू होते. यात २६ जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अपघातात ट्रक चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी जीवनधारा अम्बुलनला संपर्क साधून जखमींना तातडीने उपचारासाठी लाजरस गावीत यानी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR