23.7 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeनांदेडभीषण अपघातात ३ ठार

भीषण अपघातात ३ ठार

नांदेड-बिदर महामार्गावरील घटना मृतांमध्ये पती-पत्नी व मुलाचा समावेश

मुक्रमाबाद : प्रतिनिधी
मुक्रमाबादेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड -बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१(अ) वर बिहारीपुरजवळ दुचाकीचा भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकल्याला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २३ मे रोजी दुपारी ३ च्या दरम्यान घडली.

मुखेड तालुक्यातील परतपूर फाटा येथील मोसिन गनीसाब शेख(३०) पत्नी फरिदा मोसीन शेख(२८) व जुनेद मोसिन शेख(५) हे मुखेडहून मुक्रमाबादकडे येत होते. दुपारी ३ च्या सुमारास बिहारीपुर गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची जबर धडक लागली. यात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यास उदगीर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात त्याचाही मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा घडला याचा शोध मुक्रमाबाद पोलिस घेत आहेत. तर घटनास्थळाला सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR