ठाणे : प्रतिनिधी
मुरबाडमध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत २२ बक-यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर ६ म्हशी आणि ६ बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील पुंडलिक धुमाळ या शेतक-याच्या गोठ्याला ही आग लागली.
त्यात या प्राण्यांचा जीव गेला. मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. इथल्या कोरवळे गावातील शेतकरी पुंडलिक धुमाळ यांनीही आपल्या गोठ्यात गायी, म्हशी, बैल तसेच बक-या पाळल्या आहेत. त्यांच्या गोठ्याला अचानकपणे आग लागली.
या आगीत धुमाळ यांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. यात त्यांच्या पशुसंवर्धनाचेही नुकसान झाले. आगीत २२ बक-यांचा मृत्यू झाला. तर ६ म्हशी आणि ६ बैल होरपळून जखमी झाले.