25.8 C
Latur
Sunday, September 21, 2025
Homeमहाराष्ट्रभुजबळांनी जे करायचे ते करावे

भुजबळांनी जे करायचे ते करावे

बीड : प्रतिनिधी
मराठा जीआरविरोधात मंत्री भुजबळांनी मोठी भूमिका घेतली. त्यांनी न्यायालयीन आयुधासह रस्त्यावरच्या लढाईचे सूतोवाच केले. राज्य सरकारच्याच भूमिकेविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. मराठा जीआर हा ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर भुजबळांना काय करायचे ते करूद्या, त्याची काही अडचण नाही, असे उत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिले.

मंत्री छगन भुजबळ यांनी सध्या ओबीसी बचाव आरक्षण आणि मराठा आरक्षण जीआर रद्द करण्यासाठी रान पेटवले आहे. ते ठिकठिकाणी त्यांची भूमिका जाहीर करत आहेत. सरकारमध्ये राहूनही त्यांचा सरकारवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरानिमित्त भुजबळ नागपूरमध्ये होते. येथे त्यांनी ओबीसी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. आता समता परिषदेअंतर्गत ओबीसी समाजाची एकजूट दाखवण्यात येणार आहे. गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांना सुद्धा थेट इशारा दिला. जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढे मराठे खोलात घुसतील असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याता उत्तर देणार, असे जरांगे यांनी ठणकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR