22.1 C
Latur
Thursday, September 26, 2024
Homeलातूरभेटा येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा

भेटा येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा

भेटा : वार्ताहर 
औसा तालुक्यातील औसा-भादा-भेटा-तेर राज्यमार्ग २३९ या मार्गाचे काम सुरू आहे. बोरगाव व भादा गावात सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाची सुरुवात धाराशिव-लातूर जिल्ह्याच्या सिमेवरून अर्थात कोंड-भेटा सिमेवरुन झाली. भादा-बोरगावच्या धर्तीवर भेटामध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राज्यमार्गावर भादा, बोरगाव,भेटा हे तीन्ही गावे येतात तेही लागोपाठ मग दोन गावांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता आणि एका गावात डांबरीकरण हा अन्याय कशासाठी भेटावासियांकडून बोलले जात आहे. प्रामुख्याने भेटा गाव जिल्ह्यातील सर्वात शेवटचे गाव आहे. भेटा या गावातून राज्यमार्ग जातो अलीकडील काळात सरकारने प्रत्येक गावात सिमेंट रस्ता करण्याचा संकल्प केला आहे. रस्ता कोणताही असो संबंधित विभागाने सर्वेक्षण करत असताना भेटा गाव का वगळल.?, असा  प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत  आहेत.
भेटा गाव धाराशिव,औसा, लातूर तीन तालुक्यास जाण्यासाठी सतत वर्दळ असते. या वाहतुकीमुळे डांबरीकरण रस्ता टिकणार नाही त्यामुळे या गावातून सिमेंट रस्त्या बरोबरच नालीचे काम अपेक्षित आहे अशी मागणी गावक-यांची जोर धरत आहे. अंदाजपत्रकात जर नसेल तर नवीन अंदाजपत्रकात समाविष्ट करून घ्यावे भेटा गावात सिमेंट रस्ता व नाली करण्यात यावी गावात अवजड वाहने भरपूर प्रमाणात येतात सिमेंट काँक्रीट रस्ता नाही केला तर गावक-याच्या वतीने जनआंदोलन विचाराधीन आहे, असे सरपंच शाम शेळके यांनी सांगितले,  दरम्यानअंदाजपत्रकात भादा व बोरगावात सिमेंट रस्ता आहे तसेच भेटा गावात काँक्रीट सिमेंट रस्ता नाही या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे, असे सहायक अभियंता रोहन जाधव यांनी संगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR