सेनगाव (तालुका प्रतिनिधी) : सेनगाव तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणात बोगस झाले असून त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याने त्या कामाची योग्य चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आज सेनगाव तहसीलवर मोटरसायकलचा भव्य मोर्चा धडकला.
सेनगाव तालुक्यात शासकीय योजनेमध्ये प्रमाणात बोगस कामे झाले असून या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून व तालुक्यातील शेतक-यांना येलदरी धरणातून डावा कालवा काढून शेतक-याचे आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलावीत व तसेच सन २०२३ व २०२४ या सालातील विमा शेतक-यांना सरसगट देण्यात यावा सेनगाव तालुक्यात एमआयडीसी नव्याने निर्माण करावी यासह इतर मागण्यासाठी आज शेतक-यासह नागरिकांनी भर बाजाराच्या दिवशी भैय्या मोटरसायकल मोर्चा काढून तहसील प्रशासनाकडे निवेदन देऊन भ्रष्ट कारभाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात जलजीवन मिशनचे काम झाले असून ते काम पूर्णत: नियमबा व बोगस झाल्याने त्या कामांमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्या असल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला असून या जलजीवन मिशन कामाची सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी विनोद अंभोरे यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तसेच शेतक-याच्या शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा देशात वाढलेली महागाई कमी करण्यात यावी तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला कामे उपलब्ध करून द्या या मागणीसह मोटरसायकल मोर्चाचे आयोजन आजेगाव टी पॉईंट ते आप्पास्वामी कमान गेट या मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर काढून तालुका प्रशासनाकडे मागणीचे निवेदन देण्यात आले .
या निवेदनावर शेतकरी नेते मारुती गीते व सापडगाव सरपंच वसंतराव आवचार यासह तरुण शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या मोर्चादरम्यान सेनगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.