22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रभ्रष्टाचा-यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा

भ्रष्टाचा-यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा

शरद पवार यांचे टीकास्त्र

कोल्हापूर : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे ‘भ्रष्टाचा-यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा’ असे आता लोकच म्हणू लागल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

एका बाजूला ‘अबकी बार..चार सौ पार’ची गॅरंटी दिली जात असतानाच त्याचवेळेला विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत. कारण त्यांना लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल खात्री वाटत नाही. त्या अस्वस्थतेतूनच ते असे करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
शेतीच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे धोरण धरसोडवृत्तीचे असल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, कांद्यावरील निर्यातबंदी नुकतीच सरकारने उठवली. कांदा पिकवणारा शेतकरी हा लहान आणि जिरायती शेती करणारा आहे. त्याला चार पैसे मिळायची वेळ येते तेव्हा केंद्राने त्यावर बंदी घातली. इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केल्यावर त्याच्या उत्पादनावर निर्बंध आणले. सरकार दर पंधरा दिवसांला धोरण बदलत असल्याची टीका पवार यांनी केली.

सुप्रिया लोकसभा लढवते
मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार यांची धडपड असल्याची टीका भाजप नेते अमित शहा करतात पण सुप्रिया लोकसभेत काम करते हे त्यांना कदाचित माहीत नसावे असा टोला त्यांनी लगावला. बारामती मतदार संघातून चर्चा काहीही असली तरी अजून विरोधकांनी कुणाच्याही नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. ती करतील तेव्हा पाहू असे सांगून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत बोलणे टाळले.
…………….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR