लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसाच्या तूलनेत आज पुन्हा भाजीपाल्याची आवक कमालीची घट झाल्याची दिसून आली. बाजार समितीत शनिवारच्या सौद्यासाठी अवघ्या ४४२ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. मात्र मागील काहि दिवसापूर्वी मनपा प्रशासन व शहर वाहतून शाखेच्या वतिने शहरातील रोडलगत भाजीपाला विके्रत्यांना उठवल्याने स्थानीक व्यापा-यांनीही काहि प्रमाणात बाजार समितीतून भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंडईत येणारी आवक मंदावली आहे.
शहरातील बाजार समितीत ग्रामीण भागासह शेजारल जिल्ह्यातून तसेज शेजारी राज्यातून भाजीपाल्याची मोठया प्रमाणावर आवक होते. गेल्या दोन महिन्यापासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही काहि प्रमाणात कमि-जास्त होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत भाजीचे दर वाढल्याचे पाहून अनेक शेतक-यांनी बाजार समितीत न जाता शहरातील काहीं भागात थाबून थेट ग्राहकांना विक्री करत आहे. शहरातील बाजार समितीत येणा-या भाजीपाल्याचे अवघ्या दोन तासांत सौदा होवून जात आहे. एवढा मोजका माल स्थानिक बाजारपेठेत पाठवला जात आहे. त्यामुळे काहि भाज्यांच्या दरात भाववाढ झाली असल्याचे आडत व्यापा-यांनी सागीतले. परंतु काही दिवसांपूर्वी काही भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र, गेल्या आठवड्यापासून मागणीच्या तुलनेत काही भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होत नसल्याने अवघ्या काहीच दिवसांत पुन्हा किरकोळ भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारात भेंडी, फरसबी, फ्लॉवर या दैनंदिन भाज्यांना मोठी मागणी असते. परंतु याच भाज्यांची आवक घटल्याने शहरातील किरकोळ विके्रत्यांकडे प्रतिकिलो भेंडी ३० रुपये, फ्लॉवर २० रुपये, कारले ३० रुपये, हिरवी मिरची २० ते ३० रुपयांनी विकली जात आहे. तर काहि भाज्या अगदी कवडी मोल भावात विक्री केली जात आहे.
शहरातील बाजार समितीत वागें ११ क्विंटल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, भेंडी ८ क्विंटल आवक होवून २४० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी ३२ क्विंटल आवक होवून ४० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी १८ क्विंटल आवक होवून १०० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ३२ क्विंटल आवक होवून ५० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे ६७ क्विंटल आवक होवून ६० रूपयांचा दर मिळाला, गवार २ क्विंटल आवक होवून ६०० रूपयांचा दर मिळाला, भोपळा १२ क्विंटल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची ३९ क्विंटल आवक होवून ३४० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची २८ क्विंटल आवक होवून १६० रूपयांचा दर मिळाला, वरणा ४ क्विंटल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, दोडका ८ क्विंटल आवक होवून २४० रूपयांचा दर मिळाला, पालक १ क्विंटल आवक होवून ८० रूपयांचा दर मिळाला, शेपू १ क्विंटल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, कोथिंबीर ३२ क्विंटल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, मेथी १० क्विंटल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, लिंबू २० क्विंटल आवक होवून ४५० रूपयांचा दर मिळाला, काकडी ३१ क्विंटल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, कारले २४ क्विंटल आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, बिट ८ क्विंटल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला असून बाजारात ४४२ क्विंटलची आवक झाली आहे.