मंदीची चाहूल?

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने कठोर पतधोरणाचे दिलेले संकेत, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि बाँडच्या उत्पन्नात झालेली वाढ यामुळे जागतिक स्तरावर तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच देश संभाव्य आर्थिक संकटापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने उपाययोजना आखत आहेत. नेदरलँड्सच्या डच मध्यवर्ती बँकेने अमेरिकेत सुरक्षित ठेवलेला आपला ८६ टन सोन्याचा साठा अचानक ब्रिटनमध्ये हलवल्याने जागतिक अर्थकारणात मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे.

जगातील अनेक देशांनी सुरक्षा आणि तांत्रिक सोयीसाठी आपले सोन्याचे राष्ट्रीय साठे अमेरिकेत सुरक्षित ठेवले आहेत. न्यूयॉर्कमधील ‘फेडरल रिझर्व्ह बँके’च्या सुरक्षित भूमिगत तिजोरीत जगातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा जतन करण्यात आला आहे. या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणा-या तिजोरीत जमा असलेल्या एकूण सोन्यापैकी तब्बल ९८ टक्के सोने हे विविध सरकारे आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकांचे आहे. २ सप्टेंबर रोजी डच मध्यवर्ती बँकेने या संदर्भात अधिकृत आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली. उत्तर अमेरिकेत ठेवलेला अब्जावधी डॉलर्स मूल्याचा सोन्याचा साठा बँकेने ब्रिटनमध्ये हस्तांतरित केला आहे. वाढता जागतिक भू-राजकीय तणाव आणि अनिश्चिततेच्या काळात घेतलेल्या या निर्णयाला डच बँकेने ‘संकटकालीन पूर्वतयारी’ असे संबोधले आहे. हे संपूर्ण हस्तांतरण अत्यंत गुप्ततेने मार्च ते ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पार पाडण्यात आले. न्यूयॉर्क आणि कॅनडातून सोन्याचे हस्तांंतरण करण्यात आले आहे. डच मध्यवर्ती बँकेने एकूण ३१३ मेट्रिक टन सोने न्यूयॉर्क आणि कॅनडाची राजधानी ओटावा येथे सुरक्षित ठेवले होते. त्यापैकी ८६ मेट्रिक टन सोने बँकेने सुरक्षिततेच्या कारणास्तव लंडनला हलवले आहे.

या हस्तांतरणापूर्वी, न्यूयॉर्कमधील तिजोरीत नेदरलँड्सच्या एकूण सोन्यापैकी ३१.३ टक्के तर ओटावामध्ये १९.७ टक्के सोन्याचा साठा उपलब्ध होता. मात्र, या ८६ टन सोन्याच्या यशस्वी हस्तांतरणानंतर आता न्यूयॉर्क आणि ओटावा या दोन्ही शहरांमध्ये मिळून डच सोन्याचा साठा केवळ १८.५ टक्क्यांवर आला आहे. अमेरिकेत आणि कॅनडात ठेवलेला आपला सोन्याचा साठा लंडन तसेच नेदरलँड्समध्ये हलवण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर डच मध्यवर्ती बँकेने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बँकेच्या या निर्णयामागे आर्थिक सुरक्षितता, लवचिकता आणि बाजारातील व्यापारक्षमता वाढवणे ही मुख्य कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. सोन्याचा साठा हलवण्यामागचे मुख्य कारण डच मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२५च्या अखेरीस बँकेकडे एकूण ६१२.४ मेट्रिक टन सोन्याचा प्रचंड साठा उपलब्ध होता. या साठ्याचे तत्कालीन मूल्य ७२.२ अब्ज युरो (सुमारे ८३.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतके होते. बँकेच्या गव्हर्नरांनी या हस्तांतरणाचे समर्थन करताना सांगितले की, या निर्णयामुळे आमच्या सोन्याच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारक्षमता आणि वापराची सुलभता अधिक सुधारली आहे. हा सोन्याचा राखीव साठा प्रत्यक्ष वापरण्याची वेळ भविष्यात कधीही येऊ नये अशीच आमची इच्छा आहे.

मात्र जागतिक स्तरावर निर्माण होणा-या कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आपली तयारी आणि आर्थिक लवचिकता मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डच बँकेने आपला अब्जावधी डॉलर्स मूल्याचा सोन्याचा साठा उत्तर अमेरिकेतून थेट लंडनमध्ये स्थलांतरित केला आहे.‘बँक ऑफ इंग्लंड’मध्ये सुरक्षित ठेवले जाणारे सोने हे आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार मानकांची शंभर टक्के पूर्तता करते. ‘बँक ऑफ इंग्लंड’मधील सोन्याचा साठा हा सर्वांत सहज, वेगाने आणि विनाअडथळा व्यापार करता येणारा साठा मानला जातो. जर भविष्यात एखादे मोठे आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट उद्भवले तर डच बँकेला हा सोन्याचा साठा त्वरित आणि अत्यंत सुलभतेने वापरणे अथवा विकणे शक्य होणार आहे. न्यूयॉर्क आणि ओटावा येथील तिजो-यांमध्ये ठेवलेला सोन्याचा साठा संकटकाळात इतक्या वेगाने, सहजासहजी आणि थेट वापरता येत नाही म्हणून डच बँकेने सोन्याचा साठा लंडन येथे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, म्हणून जागतिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेटचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46

Latest news