16.7 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘मच्छर’ ठरणार गेमचेंजर; अमेरिका, चीनला झपाटले

‘मच्छर’ ठरणार गेमचेंजर; अमेरिका, चीनला झपाटले

वॉशिंग्टन/बिजींग : वृत्तसंस्था
जगभरातील संरक्षण सामुग्री बनवणा-या डिझायनर्सनी अशा घातक ड्रोन्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. मायक्रो ड्रोनचे वजन एका छोट्या पक्षाइतके किंवा एका मच्छर इतके असू शकते. हे ड्रोन सामान्य डोळ्याला दिसणे कठीण, त्याचा आवाज ऐकू येणे अशक्य आणि रोखणे तर जवळपास अशक्य आहे.

सध्या बॅटरी मायक्रो ड्रोनचा वीक पॉइंट आहे. बॅटरी कमजोर आहे. पण ही कमजोरी दूर केल्यानंतर हे ड्रोन्स युद्धातील सर्वात घातक अस्त्र ठरतील. कारण पक्षी, मच्छर सारख्या आकाराच्या या ड्रोन्सची ओळख करणेच कठीण होऊन बसेल. ज्या देशाकडे अशा प्रकारची ड्रोन्स असतील, तिथे शत्रुला माघार घ्यावीच लागेल. युद्धभूमीत ही मायक्रो ड्रोन्स गेमचेंजर ठरतील.

अमेरिकेतील संरक्षण कंपन्या अशा मायक्रो ड्रोन स्वॉर्म टेक्नॉलॉजी विकसित करण्याच्या मागे लागल्या आहेत. आपले लक्ष्य निवडणे, हवेत दिशा बदलणे, शत्रुच्या ‘युएव्ही’ला धडकून आत्मघातकी हल्ला, सैनिक, मिसाइल्स आणि वाहनांना घेरुन क्षणार्धात संपवणे ही उद्दिष्ट्य मायक्रो ड्रोन विकसित करण्यामागे आहेत. एक्सपर्टने असे सांगितले की, ‘एकदिवस असा येईल जेव्हा तुम्ही ५० डॉलरच्या ड्रोनने ५० लाख डॉलरचे मिसाइल पाडाल.

‘स्वचालित युद्धाचा’ जन्म
मानवी सूचनेशिवाय युद्धभूमी समजून घेणारे, अडचणी ओळखून रस्ता बदलणारे, लक्ष्याची प्राथमिकता ठरवणारे आणि गरजेनुसार रणनिती बदलणारे असे स्वॉर्म एल्गोरिदम विकसित करण्यावर भर दिला जात असून त्यातून ख-या अर्थाने ‘स्वचालित युद्धाचा’ जन्म होईल. जगभरातील संरक्षण सामुग्री बनवणा-या डिझायनर्सनी अशा घातक ड्रोन्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे ड्रोन सामान्य डोळ्याला दिसणे कठीण, त्याचा आवाज ऐकू येणे अशक्य आणि रोखणे तर जवळपास अशक्यप्राय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR