30.8 C
Latur
Friday, May 2, 2025
Homeमहाराष्ट्रमजुरांच्या वाहनाला अपघात; ३ महिला ठार

मजुरांच्या वाहनाला अपघात; ३ महिला ठार

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड-अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला.

कामगार दिनाच्या दिवशी झालेल्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली. याची माहिती समजताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.

गुरवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता. मात्र, धामणगाव परिसरात अचानक वाहनाचे टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला.

तसेच दुस-या एका घटनेत, मुंबई-नाशिक महामार्गावर अवघ्या १० किलोमीटरच्या अंतरावर २ भीषण अपघात घडले आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR