28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य

मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य

बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे हिंसाचार थांबता थांबेना

इंफाळ : जवळपास दीड वर्ष उलटत आले तरी मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. मागच्या वर्षी दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले होते. दरम्यान, आता त्यापेक्षा भयानक घटना मणिपूरमध्ये घडली आहे. येथे जिरीबाम जिल्ह्यातील एका गावामध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून तीन मुलांच्या आईसोबत क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. या ३१ वर्षी महिलेचा क्रूरपणे क्षण केल्यानंतर हल्लेखोरांनी तिला जिवंत जाळले. आता अटॉप्सी रिपोर्टमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पीडित महिलेल्या पतीने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये घरामध्ये घुसून माझ्या पत्नीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असा दावा केला आहे. मात्र आसाममधील सिलचर मेडिलक कॉलेजमध्ये झालेल्या पोस्टमार्टेममधून महिलेवर बलात्कार करण्यात आला होता किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत होता. त्यामुळे तिच्या गुप्तांगातून स्मीयर गोळा करण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

या महिलेचे शरीर ९९ टक्क्यांपर्यंत जळून गेले होते. तसेच तिच्या हाडांचीही जवळपास राख झाली होती. अटॉप्सी रिपोर्टमधून या महिलेसोबत करण्यात आलेल्या क्रूर कृत्याबाबत एवढी भयावह माहिती समोर आली आहे की, त्याबाबत अधिक लिहिणेही शक्य नाही. या रिपोर्टमध्ये महिलेच्या उजव्या मांडीमागे घाव आणि डाव्या मांडीमध्ये खिळा घुसल्याचे नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाही तर महिलेच्या शरीरावरील काही अवयवही गायब झालेले होते. दरम्यान, कुकी-जो संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच ही घटना क्रूर असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणा आरोपींचा शोध घेऊ न शकल्यानेही नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR