20.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeलातूरमतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो

मतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो

लातूर : प्रतिनिधी
सर्व समान्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणने, हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. त्या विचाराचे पाईक म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, जिल्हा बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख हे लातूर शहर महानगरपालिकेचा सर्वागीन विकासासाठी सातत्याने विकासाच्या योजना खेचून आणत असून मतदारांच्या अपेक्षा केवळ काँग्रेस पक्षच पूर्ण करु शकतो. त्यामुळे गुरूवारी मतदारांनी कॉग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला मतदान रूपी आशिर्वाद देवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहावे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रीक निवडणूकीच्या अनुषंगाणे शहरातील प्रभाग क्र. १५ चे काँग्रेस-वंचित आघाडीचे अधिकृत अमेदवार जयराम मनोज स्वामी, प्रा. राजकुमार भाऊराव जाधव, श्रीदेवी संकेत उटगे, प्रा. डॉ. स्मिता कैलास खानापुरे, प्रभाग क्रमांक १० चे अधिकृत उमेदवार कांचन रत्नदीप अजनीकर, सुकेशनी बालाजी मुकावाड, दीपक गंगाधर सुळ, डॉ. बालाजी विठ्ठलराव सोळुंके, तसेच प्रभाग क्रमांक ११ चे अधिकृत उमेदवार सुजाता विजय अजनीकर, पवन भानुदास सोलंकर, छाया रंगनाथ बंडगर, विकास हनुमंत वाघमारे यांच्या पचारार्थ आयोजीत महिला संवाद बैठकीत विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. याप्रसंगी अ‍ॅड. जयश्रीताई पाटील, तनुजा कांबळे, राम स्वामी यांची प्रमुख उपस्थितीती होती.
पुढे बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या, विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या प्रयत्नातून लातूर शहर महानगरपालिकेचा विकास झाला आहे. विलासरत्न विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याची निर्मिती १६ ऑगस्ट १९८२ साली केली. तेव्हापासून आजपर्यत लातूरच्या नागरीकांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. कॉग्रेस पक्ष हा गोर-गरीब जनतेसह संस्कृती जपणारा पक्ष आहे.
आज आपण पाहतोय कोणीही कोठूनही येवून जाती-पातीचे राजकारण करीत आहे. कॉग्रेस पक्षाने कधीही जाती-पातिचे राजकारण केले नाही. भाजप सरकारचे लोक हे जाती-पातीचे राजकारण करीत सामान्य नागरीकांत तेढ निर्माण करीत आहेत. खोट्या जाहिराती करीत खोटी आश्वासने देऊन मतदारांची घोर निराशा केली जात आहे. शेतक-यांच्या शेतीमालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, महिलांची सुरक्षा नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत. एकेकाळी प्रगत असलेला महाराष्ट्र या महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आज रसातळाला गेला आहे. त्यामुळे मतदारांनी  या भमट्या सरकारला आता धडा शिकवावा, असे नमुद करुन कॉग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला मतदान रूपी आशिर्वाद देत खंबिर साथ देण्याचे आवाहन केल.
याप्रसंगी सुनिता गाडे, कविता पटगे, सुचिता पाटील, अनिता पाटील, संगिता म्हेत्रे, आशा हालकुडे, अर्चना उटगे, सरीता उटगे, अमृता उटगे, रंजना घुसे, सुमित्रा उटगे, लक्ष्मी पुने, संगीता शहरकर, रत्नमाला वोपलकर, सुरेखा विलगुदे, पायल हासबे, परी कुलकर्णी, राधिका हासबे, शामा धर्माधिकारी, सुशिला धुमपल्ले, प्रणिता नवटाके, इरफाना शेख, मृणाली बोपलकर, संगीता जवळे, रंजना शिंदे, वंदना जबडे, शुभांगी पाटील, रेणुका जाधव, अनुराधा चव्हाण, अरुणा राठोड,कावेरी चव्हाण, सुषमा जाधव, रेखा गोरे, स्वाती कांबळे, चंद्रकला जाधव, सुरेखा कदम, चतुरा  ढोले, अनुराधा ढोले, त्रिशला ढोले, द्रौपदा चव्हाण, रेखा झिरेकुंडे, रुक्मिणी बेडके, नेहा कांबळे, अर्चना माळी, वनमाला  सूर्यवंशी, आशा कांबळे, मंगल शृंगारे, स्मिता लांडगे, कल्पना कांबळे, संगीता कांबळे, संजीवनी कांबळे, श्रुती शृंगारे यासह आदी महिला उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR