लातूर : प्रतिनिधी
लोकशाही प्रधान देशात प्रत्येक भारतीयास मिळालेला अधिकार म्हणजे मतदान आणि प्रत्येक मतदारात याविषयीची जनजागृती व्हावी यासाठी दि. २५ जानेवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत निवडणुक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.
भारतीय लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशातील मतदार निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावीत असतात. भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडून भयमुक्त व नि:पक्षपाती वातावरणात सर्व निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहे. निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे, त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आंदोलन करुन मतदार जनजागृती करण्यात आली.
या आंदोलनात लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, विधीज्ञ विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. बाबासाहेब गायकवाड, लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. फारुक शेख, अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष प्रविण कांबळे, युवक काँग्रेसचे इम्रान सय्यद, गोरोबा लोखंडे, दगडूअप्पा मिटकरी, कैलास कांबळे, जालिंदर बर्डे, अॅड. शरद देशमुख, राम स्वामी, अॅड. देविदास बोरूळे पाटील, शिवाजी कांबळे, धनंजय शेळके, यशपाल कांबळे, राहुल डुमने, दत्ता सोमवंशी, मैनुद्दीन शेख, करीम शेख, प्रा.संजय ओव्हळ, कुणाल वागज, पवन गायकवाड, अमित पाटील, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे,
अकबर माडजे, के. एन. अंबाड, अभिजित इगे, अमोल गायकवाड, बब्रुवान गायकवाड, राजू गवळी, नितीन कांबळे, अॅड. अंगद गायकवाड, अंगद वाघमारे, सोमेन वाघमारे, धनंजय गायकवाड, विजय टाकेकर, अॅड. विजय गायकवाड, तबरेज तांबोळी, आकाश मगर, सायरा पठाण, पाशाभाई शेख, पिराजी साठी, मंंगेश वैरागे, राजवर्धन सवाई, अॅड. गणेश कांबळे, नानासाहेब डोंगरे, राजू पुंड, अॅड. सुमित खंडागळे, संजय पाटील खंडपूरकर, शफीउद्दीन बागवान, मुकरम टाके, गोविंद डुरे पाटील, लिंबराज पाटील, अमोल भागवत, शेख खलील, सहदेव मस्के, श्याम जाधव, तसेच माजी नगरसेवक काँग्रेसच्या इतर फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.