25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीय‘मदर’ डेअरीच्या दूध दरात वाढ

‘मदर’ डेअरीच्या दूध दरात वाढ

मुंबई : देशभरात आजपासून (दि.३ जून) अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने देखील दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. लोकसभा निवडणूक संपताच देशातील दोन मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. प्रथम अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली. अवघ्या १२ तासांनंतर मदर डेअरीनेही आपल्या उत्पादनांच्याकिंमती वाढवण्याची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मदर डेअरीने 3 जूनपासून ताज्या पाऊच दुधाचे (सर्व प्रकारचे) दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवले ​​आहेत.

याआधी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केंिटग फेडरेशनने सांगितले होते की, दुधाचा एकूण खर्च आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता सोमवारपासून सर्व प्रकारच्या अमूल दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये अमूल दुधाच्या पाऊचच्याकिंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे.

जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता यांनी सांगितले की, अमूल ब्रँड अंतर्गत सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतक-यांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे मेहता यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR