22.6 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeलातूरमध्यवर्ती बसस्थानक घाणीच्या विळख्यात 

मध्यवर्ती बसस्थानक घाणीच्या विळख्यात 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्थी बसस्थानकांत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून बसस्थानकाच्या चोहोबाजून घाणच घाण असल्यामुळे हे बसस्थानक घाणीच्या विळख्यात सापडले आहे. शौचालयाची दुर्गंधी, मोकाट जनावरांचा सुळसुळाट,  घाण पाण्याचे डबके, माश्या, डासांची  फलटण  प्रवाशांना बसस्थानकात  थांबणेही अवघड झाले आहे. याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथे दररोज स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिक, प्रवासी यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. शहरातील मध्यवर्थी बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापुर, बार्शी, नांदेड यासह विविध भागातील रोज जेष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले यासह लाखो प्रवासी प्रवास करतात. येथे प्रवासी यांना बसण्यासाठी काही वर्षापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून सुसज्ज आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.
 तसेच याच भागात तंबाखू, गुटखा खाऊन सर्वत्र थुंकलेले असतात. बसस्थानकात बैठक व्यवस्था अपुरी असल्याने प्रवाशांना उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. तर काही ठीकणी प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागासह लाब पल्याच्या प्रवाशांना नाईलाजाने उभे राहून बसेसची वाट पाहावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. राज्यातील विविध ठिकाणी ग्रामीण भागात जाण्या येण्या करीता या ठिकाणाहून एसटी उपलब्ध आहेत. नेहमीच प्रवाशांनी गजबजलेलं हे बस स्थानक आहे.  मात्र, हे बस स्थानक सुविधांपासून दूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  बस स्थानकात स्वच्छतेचा देखील अभाव आहे. येथील घाणीच्या साम्राज्याचा सामना प्रवाशांना करावा लागत असून यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बसस्थानकावर मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून येथील स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. बसस्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायाचे घान पाणी, टाकाऊ कचरा येथे टाकला जात असल्याने येथील नागरिक सांगतात. असस्थानकात जागोजागी पाणी साचल्याने दुर्धंत पसरली आहे. या दुर्गंधीमुळे प्रवाशांना बसस्थानकात बसण्याची इच्छा होत नसल्याचे प्रवाशी वर्गाने सागीतले आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस महानगरपालिकाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी येथे येऊन स्वच्छता करतात. परंतु ऐरवारी सफाई होत नसल्याने पुन्हा कचरा साचत आहे. अशी माहिती मध्यवर्थी बस स्थानकातील सुत्रानी एकमतशी बोलताना दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR