26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeलातूरमध्यवर्ती बस स्थानकातून बस सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेणार

मध्यवर्ती बस स्थानकातून बस सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेणार

लातूर : प्रतिनिधी
मध्यवर्ती बस स्थानकातून औसा-सोलापूर तुळजापूर कोल्हापूर, बार्शी-पुणे-मुंबई, धाराशिव, कळंब बस सेवा पूर्ववत सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी नागरी हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटना लातूर यांनी यापूर्वी विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामार्ग राज्य परिवहन, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने पूर्वीच्या निर्णयात बदल न केल्यामुळे संघर्ष समिती आणि प्रवासी संघटना यांनी लातूर जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्ववत बस सेवा सुरू करावी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
 तसेच अवैद्य व खाजगी वाहतूक वाहनामुळे झालेली कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आग्रही निवेदन दिले असता जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेईन असे आश्वासित केले. तसेच खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची संघर्ष समिती आणि प्रवासी संघटनेने भेट घेतली असता त्यांनी विभाग नियंत्रक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्ववत बस सेवा सुरू करण्यासाठी सूचित केले. या शिष्टमंडळात प्रामुख्याने उदय गवारे, सूर्यप्रकाश धूत, बसवंत भरडे, कॉ.विश्वंभर भोसले, रामकुमार रायवाडीकर, रघुनाथ बनसोडे, लाला सुरवसे, नवनाथ आल्टे, नागनाथ साळुंखे, प्रा. आनंत लांडगे, अ‍ॅड जैनु शेख, तसेच खासदार यांना भेटताना अशोक गोविंदपुरकर, रवी गायकवाड,विनय जाकते, अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या निवेदनावर पांडुरंग देडे, दीपक गंगणे, जी ए गायकवाड, गणपतराव तेलंगे, रईस टाके, सतीश कारंडे, शेख मैनूदिन, ,डी उमाकांत, डॉ. बालाजी रणक्षेत्रे, अँड लक्षण शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, किसन सूर्यवंशी, शेख अब्दुल्ला, गोरोबा मगर, सुरज पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR