22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमनपाच करतेय पाण्याची नासाडी

मनपाच करतेय पाण्याची नासाडी

लातूर : प्रतिनिधी
संभाव्य पााणीटंचाई लक्षात घेता लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील विद्यूत पंप व हातपंपांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले असले तरी दुरुस्त केलेल्या विद्यूत पंपातील हजारो लिटर्स पाणी वाया जात असतना त्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विद्यूत पंप व हातपंप दुरुस्त करुन पाणी वाया जात असेल तर ते दुरुस्त न केलेलेच बरे. कारण जमिनीतील पाण्याची पातळीतर शाबूत राहिल. मनपा यंत्रणेकडूनच पाण्याची नासाडी होत असेल तर नागरिकांनी पाणी काटकसरीने वापराने, असे आवाहन करण्याला काहींच अर्थ उरत नाही, ही बाब मनपा प्रशासनाने लक्षात घेऊन पाणी वाया जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

यंदाच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी ऐवढाही पाऊस पडलेला नाही. लातूर शहराला पाणी पुरवठा होणा-या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस पडलेला नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झालेली नाही. मांजरा धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सद्य:स्थितीत मांजरा धरणात १९.६२ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. या पाण्यावर धरणावरील लातूर शहरासह विविध २१ पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत. लातूर शहरासाठी दररोज ४० ते ५० एमएलडी पाणी मांजरा प्रकल्पातून उचलले जाते. त्यावरचा थोडासा ताण कमी व्हावा, या हेतूने लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील विद्यूत पंप व हातपंपाच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन जिथे पाणी आहे तिथे पंप सुरु केले आहेत. परंतू, याच ठिकाणी पाणी वाया जात असताना त्याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे.

लातूर शहरामध्ये १०६१ विद्यूत पंप आहेत. त्यापैकी ९७६ विद्यूत पंप चालू आहेत तर ४० विद्यूत पंप कायमचे बंद आहेत. २५ विद्यूत पंप वापरात नाहीत. २० विद्यूत पंपांमध्ये काही ना काही अडकून ते बंद पडले आहेत. शहरात एकुण २५४ हातपंप आहेत. यातील १२४ हातपंप सद्य:स्थितीत चालु आहेत. १३० हातपंप नादुरुस्त आहेत. केवळ १२४ हातपंपाचे पाणी नागरिकांना घेता येत आहे. शहरात सद्य:स्थितीत ९७६ विद्यूत पंप आणि १२४ हातपंप सुरु आहेत. त्यातून नागरिकांना पाणी मिळते. परंतू, पाण्याच्या वापरापेक्षा वाया जाणा-या पाण्याची टक्केवारी अधिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR