18.9 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रमनमोहन सिंग यांचा कालखंड आधुनिक भारताचा सुवर्ण काळ

मनमोहन सिंग यांचा कालखंड आधुनिक भारताचा सुवर्ण काळ

सातारा : प्रतिनिधी
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा, माहिती अधिकार, खाद्यान्न सुरक्षा, भूमि अधिग्रहण, शिक्षण हक्क, यासारखे कायदे झाले. त्यामुळे हा दहा वर्षांचा कालखंड आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असे पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

जागतिक मंदीच्या काळात महत्त्वाची भूमिका- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले, जागतिक मंदीच्या काळामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी देशाला आर्थिक मंदीची झळ बसू दिली नव्हती. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु ते राजकारणी नव्हते.

अर्थतज्ज्ञ असल्याचा नव्हता गर्व- पृथ्वीराज चव्हाणांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून ६ वर्षे काम केले होते. त्या काळात मी त्यांचा अत्यंत निकटवर्तीय होतो. ते उच्चशिक्षित आणि अर्थतज्ज्ञ होते. त्याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. डॉ. मनमोहन सिंग यांना राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. राजकारणात असूनही ते राजकारणी नव्हते, असे त्यांना म्हटले जायचे. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधानांसारखे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड नम्रता होती. हे मी अगदी जवळून पाहिले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणा-या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय हे डॉ. मनमोहन सिंग यांना जाते-माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR