नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. माजी पंतप्रधानांची प्रकृती खालावल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले.
९२ वर्षीय सिंह यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र नंतर त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी रात्री ९.५१वाजता अखेरचा श्वास घेतला.
राहुल गांधी , प्रियंका गांधी यांनी मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी मनमोहन सिंग यांच्यासोबत काँग्रेस मुख्यालयात त्यांना अखेरचा निरोप दिला.
सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. येथे पक्षाचे कार्यकर्ते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.
पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पार्थिव तिथेच ठेवण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याच्या मुद्द्यावर भाजपचे खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीए सरकार देशाचा मोठा पाया रचणा-या माजी पंतप्रधानांना योग्य तो सन्मान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. आर्थिक विकासासाठी वचनबद्ध आहे. हे पाहता मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि समाधी बांधण्याचा निर्णय घेतला आणि याची माहिती काँग्रेस पक्षाला देण्यात आली आहे.
पॅलेस्टाईनच्या राजदूताने केला शोक व्यक्त
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल नवी दिल्लीतील पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी आबेद एलराजेग अबू जजर म्हणाले की, आज आम्ही माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ आणि एका बुद्धिमान व्यक्तीच्या निधनाबद्दल काँग्रेस पक्ष आणि भारतातील लोकांप्रती तीव्र शोक व्यक्त करतो.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे पंजाबचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वॉर्डिंग म्हणाले की, आम्ही सरकारने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहोत. अटलबिहारी वाजपेयी यांना स्थान देता येते, तर मनमोहन सिंग यांना का नाही? ते देशाचे एकमेव शीख पंतप्रधान होते. स्मारक बांधले की ते भावी पिढ्यांना प्रेरणा देईल.