19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनसेचं नाव टिकेल इंजिन जाईल; निवडणुकीचा सर्वात मोठा फटका?

मनसेचं नाव टिकेल इंजिन जाईल; निवडणुकीचा सर्वात मोठा फटका?

 

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. गेल्या निवडणुकीत तरी मनसेचा एक आमदार जिंकून आला होता. पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

‘‘मनसेची पक्षाची मान्यता रद्द होणं म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्रि असतं ते त्यांना घ्यावं लागतं. कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही’’, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी दिली.

निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात. १ आमदार किंवा एकूण मतदानाच्या ८ टक्के मते मिळाली तर त्यांची मान्यता राहते. २ आमदार किंवा एकूण मतदानाच्या ६ टक्के मतं, ३ आमदार किंवा एकूण मतदानाच्या ३ टक्के मतं मिळायला हवीत. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते. नाहीतर मान्यता काढली जावू शकते, असे अनंत कळसे यांनी सांगितले. दरम्यान, या निवडणुकीत मनसेला केवळ १.८ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

‘‘निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेवू शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतं. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही’’, असं देखील अनंत कळसे यांनी यावेळी सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR