22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेचे अमित ठाकरे पराभूत

मनसेचे अमित ठाकरे पराभूत

ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय

माहीम : माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीमध्ये अखेर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. या तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटत होतं. पण अखेर महेश सावंत यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली.

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी जनतेकडून वेगळी सहानुभूती होती. येथे सदा सरवणकर हे देखील मैदानात असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये टफ फाईट झाली. अमित ठाकरे तिस-या क्रमांकावर होते. सदा सरवणकर दुस-या क्रमांकावर राहिले. पहिल्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत होते. त्यांनी आधीपासून लीड कायम ठेवली.

मच्छिमार वसाहत इमारतींचा पुनर्विकास असो किंवा पोलीस बांधवांना सुरक्षित घरे देण्याचा मुद्दा असो. अमित ठाकरे यांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घातला होता. पण तरी देखील त्यांचा पराभव झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR