33.7 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeसोलापूरमनीषा मुसळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनीषा मुसळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्त्ये प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी स्वतःहून न्यायालयाने कोठडीची मागणी केली आणि पोलिसांचा युक्तीवाद मान्य करून न्यायालयाने अवघ्या दोन मिनिटांत सुनावणी संपवली.

पोलिसांनी स्वतःहून न्यायालयीन कोठडी मागितल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगीरे यांनी कोणताही युक्तीवाद केला नाही. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला शनिवारी (ता. १९ एप्रिल) रात्री सदर बझार पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने सुरुवतीला तीन दिवसांची, तर त्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. वाढीव कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी आज मुसळे-माने हिला न्यायालयासमोर उभ केले होते.
दरम्यान, आजची सुनावणी एकदम वायुवेगाने झाली. पोलिस संपूर्ण तयारी करून आल्याचे दिसून आले.

पोलिसांच्या वतीने युक्तीवाद करताना चौकशीसाठी कस्टडीचे हक्क राखून मनीषा मुसळे-माने हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या एक मिनिटांत युक्तीवाद संपवला आणि न्यायालयाने दुसऱ्याच मिनिटात पोलिसांची युक्तिवाद मान्य करून मनीषा मुसळे माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी स्वतःहून न्यायालयीन कोठडी मागितल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगीरे यांनी कोणताही युक्तीवाद केला नाही. दरम्यान, पोलिस कोठडीच्या दुसऱ्या दिवशी मनीषाला सकाळी दहाच्या सुमारास चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर साधारणतः रात्री साडेनऊपर्यंत तिला सदर बझार पोलिस ठाण्यातच बसवून ठेवून आले होते.

तिची गुरुवारी (ता. २४ एप्रिल) चार ते साडेचार चौकशी करण्यात आलेली आहे. वळसंगकर हॉस्पिटलमधील आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत, त्यात डॉक्टरांच्या सून डॉ. शोनाली यांचाही समावेश आहे.

मनीषा मुसळे माने हिच्याकडून ई-मेलची मूळ प्रत जप्त करायची आहे, तिने कोणते खोटारडे आणि घाणेरडे आरोप केले होते, याचाही तपास करायचा आहे, फाडलेल्या ई-मेलचे तुकडे जप्त करायचे आहेत, आदींसह दहा बाबींसाठी पोलिसांनी मागील सुनावणीत पोलिस कोठडी मागितली होती. त्या तुलनेत आज पोलिसांनी कोणताही मोठा युक्तीवाद न करता अवघ्या दोन मिनिटांत न्यायालयीन कोठडी मागितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR