16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeक्रीडामनू भाकरसह चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर

मनू भाकरसह चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन पदक जिंकून देणा-या मनू भाकरसह वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील एकून चार खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यासह बुद्धीबळ क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी करुन दाखविणा-या विश्व चॅम्पियन गुकेश डी. याचाही यात समावेश आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींकडून खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR