30.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंची प्रकृती स्थिर

मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर

बीड : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पुढील २४ तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, बीडमधील मेळाव्यात भाषण देताना त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती ठीक नसल्याचा त्यांनी आपल्या भाषणादरम्यान उल्लेख केला होता.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना भाषण देण्यातही अडचणी येत होत्या. तरीही त्यांनी भाषण पूर्ण केले. मेळावा संपल्यानंतर आयोजकांनी तातडीने त्यांना बीडमधील रुग्णालयात दाखल केले.

बीड शहरात मराठा मेळावा आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनीअर आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. भाषणाला सुरुवात केल्यानंतर अचानक जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांनी काही काळ भाषण थांबवले. ‘मला शब्दही फुटत नाहीत,’ असे म्हणत त्यांनी काही क्षण विश्रांती घेतली. थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR