33.2 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeलातूर मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले

 मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील, असा आरोप अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला. तसेच त्यांनी मराठा आरक्षणाचा नादा सोडावा, असा सल्ला दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्लूएसच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे आता पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना आर्थिक दुर्बल घटक म्हणाले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता जाणकार नेत्यांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. मनोज जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते. परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्के पेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देणारे विद्यार्थीही त्यांचे किती नुकसान होत आहे, असे सांगू शकतात, असे सदावर्ते यांनी म्हटले.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना सदावर्ते म्हणाले, संजय राऊत यांचा इस्लामिक विचारांचा जास्त अभ्यास झालेला दिसत आहे. शरद पवार यांनीही संजय राऊत यांना एवढे डोक्यावर का घेतले आहे? असा मला प्रश्न पडला असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

मनोज जरांगे अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी लढा देत आहे. त्यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीची स्थापना राज्य सरकारने केली होती. या समितीकडून कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR